यकत व्होतंय
!!माका यकत व्होवचा हा!!
ऐक ना गे
तु गेलस ईसमुरतीत
सांगोचा काय
शेतीभाती, रीतीरिवाज
हत फक्त आठवणीत
मी आपलो यकत व्होतय
तुमका पटता की न्हाय ह्या बघतंय
मुलखात बदल व्होता
जुण्यो आठवणी च्यो खुणो
नकळत गायब व्होता
हरवल्यो त्यो जुन्यो ओळखीच्यो खुना
बदलली हत आपली माणसा ना
मुलखात ईज ईली
घासलेटच्यो कंदील, गॅसच्यो बत्ती
गायबच गे झाली
व्हय गे बाय
गॅस ईलो
चुलीयेत लाकडा जाळणा बंदच
गे झाल्यो
फुंकणेन चुल फुंकोचा बंद झाला
लायटरान गॅस पेटवुक मस्तच झाला
काय सांगो
नदीयेतले मासे पकडुक माणसा आळसली हत
त्यांच्या तीखल्याची चव ती गे
आठवणीतच रव्हली हत
आणखीन हां
सुके बांगडे,दोडया,
नीखाऱ्यावर भाजणा बंद झाला हां
करांदो आता दडी मारुन गेलो
कोंबडी कशी रवणीक बसता
माझ्या आठवणीत कशयो काय ईल्यो
आटल्याची चवच लोका ईसारली
कुळथाची पीटी जीभेरं रव्हली
भिडया वरचा आंबोळी, घावणे
आंम्ही ईसारलाव
ईकतच्या वडा पाव वर
दीस आंम्ही घालवलाव
लीऊचा हा गे
पण येवढाच पुरे गे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा