असांदे काय काय तो दोष

 ! असांदे काय तो दोष!!


काय ता *घीरमीट* *फीरमीट* 

कशाक ती *आरड* 

सवयच हा गे आमका जणू हाच

 *फटफटीची चादर* !!१!!


 *अरबट*** *चरबट* *कायव* 

तुझाच **चारकांड**ता 

उणीच बाजू ऐकान घे गे *बाय* !;१!


जीतक्या सेकंदात पाणी *गढुळ* व्होता

तसाच माणसाचा *मन* वागता !!१!!


परिस्थिती नुसार माणसा ची मना आसत पण 

बीकट परिस्थितीत माणसा लय लय दुर जातत!!२!!


संपन्न परिस्थितीत माणसा

आपुलकीन जवळ जवळ येतत!!३!!


ह्या कशाक सांगतय

सत्य उदाहरणच तुमका देतय!!४!!

पण


नको तो खोटो भाव

सांगतंय तुमका राव !!५!!


 *भालचंद्र* नावाचो एक इसम

 *कणकवली* सिंधुदुर्गात झालो त्याचो *उगम* !!६!!


व्होतो तो उघडो-नागडो

थयसंरच हगणा मुतणा

लोकांका सहन व्हयना!!७!!


भालचंद्र तो भालचंद्र

हगलो मुतलो तो भालचंद्र

उघडो-नागडो तो भालचंद्र!!८!!


लोका बघा आता कंटाळली त्येका

छळुक लागली अतोनात आता!!९!!


कोणी दील्यान कि मनात असला तरच खायायचो

बीडी न्हायतर शीगरेटी तो ओढायचो !!९!!


जगाचा पाप आपुल्या पोटात घेता

धुराचे वाफारे बाहेर सोडता !!१०


एका दिसाक चमत्कार झालो

प.,पु,साटम महाराज तेकाच भेटाक इलो!!११!!


आता लोकांका समजाक लागला

मन त्यांचा आता बदालला!!१२


देवत्व शकती आसा ही

भालचंद्र महाराज म्हणा की!!१३!!


चमत्कार मातर आजतागायत व्होवक लागले

भालचंद्र महाराज सगळेच आता म्हणोक लागले!!१४!!


मुद्दाम सत्पुरुष हेचा उदाहरण दिलंय

तुमच्या वागण्यात मुरड पडता की न्हाय 

ही आशा बाळगलय!!१५!!


ह्या जीवनात अहंपणाचा कार्टा फोडा 

मदतीचो हात पुढे करा

न्हायतर ढोंगा बीनधासत घेत रव्हा!!१६


            वसंत सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट