जरासाच, माझा ऐकशील

 !! जरासांच, माझा ऐकशील!!


रे *झीला* 

जरासा

माझा ऐकशील

माझा दुखणा -खुपना

आता सांगशील!!१!!


फळांचो राजा माझो *आंबो* 

त्येकाच आता तु म्हणतस ना *मॅंगो ,मॅंगो* !!२!!


 *आये* 

हयो शब्दच

मेल्या खयतरी गेलो हा

 *बापाशीक*

 *डॅडीन* येढलेलो जो हा!!३!!


तुका सांगलयअसतय आता

ह्या मनाच्या *कणगीत* भरान ठेव

पण *कणगीच* रव्हल्यो नाय हत

मगे *मनातच* ठेव!!४!!


 *नशीब* 

छत्रपतींच्या *मावळ्यांका* तु मावळे च म्हणतस

मगे

छत्रपतींची *तलवार* बाहेर कीत्याक ठेवतंस!!५!!


 *संत* *ज्ञानेश्वरांनी* भीत चालवल्यान

मगशान *मानवान* गाडीयोचो शोध काय तो लावल्यानं!!६!!


 *संत* *तुकारामांची* कीर्ती

जगभर पसरली आसा आपुल्या *वीठुरायाची* *महती* !!७!!


तुका राग येता

तो माझ्या मातीयेत घाल

तुझा रडगाणा नंतरच माका सांग!!८!!


                 वसंत सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट