💕💕💕💕💕💕
!! *शीमगोत्सव* !!
*आयना* की *बायंना*
घेतल्याबगैरजायना
*शबय*
*शबय*
*शबय* !!१!!
*होळी* रे *होळी*
पुरणाची पोळी
*साहेबाच्या* - - -
बंदुकीची ती *गोळी*
अन्
मुलखात भारि हा *शीमगॅची* ती *गोडी* !!२!!
*शीवकळा* सुदीक येतंत
होळीयेच्या भोवती
कीती मजा येता
*गोमुक*
*शबय* देवंय रे ती !!३!!
हर हर महादेव करितं
होळी उभी *रव्हता*
*आंबेऱ्यां* सहीत *श्रीफळ*
मनमोहकच *गमता* !!४!!
काय सांगू तुमका?
कीतीवं उपास - तापास
केल्यार सुदीक देव पावत *नांय*
मगे !
आमच्या *शिमग्यात* येवा
शीवकळा रुपी देव
बोललॅ शीवाय
जायंत *नांय* !!५!!
रागे नका भरु
होळी *आसा*
माहीत हा माका
तुमच्याकडे
*माफीयेची* ती झोळी *आसा* !!६!!
कौलार कौऊल
पाषाणरुपी होळदेवावर ते
*व्होतंत*
उजव्या कौऊलाची वाट
आतुरतेने *बघतंत* !!७!!
पारधं सुदीक याच सणात *व्होता*
अख्खो गाव याचारं ताव *मारता* !!८!!
वसंत सावंत
*💝🙋♀️💝*
💕💕💕💕💕💕
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा