माझाच गाराणा
!! माझा गाराणा!! *भाग* *१* *गे* *ऐकतंस* थारो व्होयतच न्हाय हा म्हणशानच मी काय तो *बोंबाटतय* तुझो हयसरंचो सुगंध तुझ्याच झीलान पसरवल्यान आसा सातासमुद्रापार!!१!! *गाराणी* , *म्हणी* , *गाळीयो* , कशोकाय गाजवल्यान त्येना थयसरची लोका आता झाली हत गे गार!!१!! मी काय म्हणतंय ता आधी लक्षात घे उणी दुणी काढूची नाय ह्या जरासा लक्षात घे!!२!! पण आरडान,आरडान कायव उपेग न्हाय आदरणीय *बाबुजीं* सारखो *झील* परत व्होवचोच न्हाय !!३!! गे बाय तुझी भाशाच *गाळयेडी* पण एकाच वाक्यात समधो *ईशय* सांगणारी!!४!! ऐक ना गे ईशय मी भरकटतंय मातर हयसर-थयसर!!५! वसंत सावंत