मातीयेचा सांगणा
!! *लाल* *मातीयेचा* *सांगणा* !! भाग १ *रे* *झीला* वायंच जरासा *लीवशील* माझ्या *रानफळाची* माहीती जगाक सगळ्या *सांगशील* !!१!! *आंबो* , *काजु* रानमेवोच *व्होतो* पण राजदरबारी त्याचो कायच्या काय *थाट* *व्होतो* !!२!! रे *झीला* रान अळुची गंमत जराशी लीवशील अंगाक लागली तर खाज येयत थपथपया केलंस तर खावक भरपुर मजा येयत!!३!! रे *झीला* जरासा त्या फणसावंर लीव कापो की बरको ता मरांदे चारखंडाची भाजी खावंक गावांदे!!४!! आता काय म्हणायचा रानमेव्याची करवंदा तु खायत रव्हलस खयचा करवंद पुरुष खयचा करवंद नार ह्या मातर बघुक ईसारलंस!!५!! जांभळाचा कौतुक शब्दात न्हाय रे *मधुमेह* *यकती* क ईचार त्येंका *वरदान* हा रे!!६!! रे *झीला* तुच तर म्हणतस *देवाची* *करणी* *नारळात* *पाणी* मगे त्येकाच वापरून *चवीयेक* बनवतस *जेवान* *भारी* *भारी* !!७!! रे *झीला* *तवशा* बदल सांगोचय *न्हाय* एकदा काप, मीठ टाक *जीभेक* पाणी सुटल्या शिवाय काय रव्होचा *न्हाय* !!८!! ...